Psalms 121

1मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो.
मला मदत कोठून येईल?
2परमेश्वर जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा
त्याकडून माझी मदत येते.

3तो तुझा पाय घसरू देत नाही;

जो तुझे संरक्षण करतो तो कधीही स्वस्थ झोपत नाही.
4पाहा, इस्राएलाचा रक्षणकर्ता
कधीच स्वस्थ झोपत नाही किंवा कधीही झोपत नाही.

5परमेश्वर तुझा रक्षणकर्ता आहे;

परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला सावली आहे.
6दिवसा तुला सूर्य किंवा
रात्री चंद्र तुला नुकसान करणार नाही.

7परमेश्वर सर्व वाईटापासून तुझे रक्षण करील;

तो तुझ्या जिवाचे रक्षण करील.
परमेश्वरा तुला जे सर्व काही तू करशील
त्यामध्ये आता आणि सदासर्वकाळ रक्षण करील.
8

Copyright information for MarULB